मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

खुशखबर! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा; जाणून घ्या माहिती..!

Crop Insurance : अलीकडेच आता शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पीक विमा (Crop Insurance) भरलेल्या 7 लाख 12 हजार 867 शेतकर्‍यांना पीक विमा मिळणार आहे. एकाच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा यात समावेश आहे. त्यामुळे हा पीक विमा कोणत्या जिल्ह्याला मिळणार? आणि यात तुमचा समावेश आहे का? हे जाणून घ्या.

राज्यात यंदा वेगवेगळ्या भागात मोठी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे या काळात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात अतिवृष्टीच्या कारणामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना (PM Crop Insurance Scheme) सुरु करण्यात आलेली आहे.

खुशखबर! शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात; येथे क्लिक करून पहा बातमी..

या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा

सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यामध्ये खूपच अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास 4 लाख हेक्‍टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान घडून आलं. त्यामुळे अनेकांनी परभणी जिल्ह्याची पाहणी केली. महसूल प्रशासनाने पंचनामे देखील केले. असे असताना देखील पीक विम्यापोटी अग्रीम रक्कम मिळण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली नव्हती.

हे वाचलंत का? -  सोयाबीन पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर - Marathi News | Maharashtra farmer news agricultural news marathwada pune mumbai nashik kolhapur satara nagpur

परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा अग्रीम रकमेसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार येत्या महिन्याभरामध्ये पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देणे बंधनकारक आहे.

महिलांनो! मोफत गॅस सिलिंडर घ्यायचाय का? फक्त इथे करा एक अर्ज..!

हे वाचलंत का? -  अरे वा! या तीन जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर; शेतकर्‍यांना मिळणार 987 कोटी रुपये..!

अखेर परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम देण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परभणीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामधील 7 लाख 12 हजार 867 एवढ्या शेतकऱ्यांकडून पीक विमा (Crop Insurance) भरण्यात आला होता. आता या सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम मिळणार असून ही रक्कम 350 कोटींपेक्षा जास्त असणार असल्याचं बोललं जात आहे..

हे वाचलंत का? -  आता लाडक्या बहिणींना मिळणार 2100, तर “या” शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी! बघा जाहीरनाम्यातील नवे बदल..


Web Title – खुशखबर! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा; जाणून घ्या माहिती..!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj