मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

अरे व्वा! कापूस सोयाबीन अनुदान यादी जाहीर… असे तपासा यादीतील नाव!

Cotton soyabin subsidy: कापूस व सोयाबीन अनुदान (Kapus Soybean Anudan) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे व अन्य काही कारणांमुळे कापूस आणि सोयाबीनच्या किंमतींमध्ये झालेल्या घटेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. या परिस्थितीला दिलासा देण्यासाठी, राज्य शासनाने खरीप हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

कापूस व सोयाबीन अनुदान योजना – शेतकऱ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT)

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, शेतकऱ्यांना DBT प्रणालीद्वारे हे अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले नाव लाभार्थी यादीत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.

येत्या ५ दिवसांत या भागाला झोडपनार पाऊस… महाराष्ट्रात पुढील ५ दिवसांत कसा असेल पाऊस? वाचा संपूर्ण अंदाज!

कापूस व सोयाबीन (Cotton soyabin subsidy) अनुदान यादी कशी पाहावी?

हे वाचलंत का? -  मुगाचे प्रति क्विंटल दर 15 हजारांचा टप्पा लवकरचं पार करण्याची शक्यता - Marathi News | A record price of Rs 13 thousand 501 per quintal for Mugla

तुमचे नाव कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादीत आहे का, हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांना खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल:

अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सर्वप्रथम, कापूस व सोयाबीन अनुदानाची यादी पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर जा: https://uatscagridbt.mahaitgov.in/FarmerLogin/Login

Farmer Search वर क्लिक करा.
“Farmer Search” या पर्यायावर वेबसाईट उघडल्यानंतर, क्लिक करा.

आधार नंबरद्वारे लॉगिन करा.
पुढे आलेल्या पेजवर आधार नंबर टाकून, “Get OTP for Aadhaar Verification” या बटनावर क्लिक करा. OTP प्राप्त झाल्यावर, ते टाकून पुढे जा.

यादीतील नाव शोधा.
OTP व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, व गाव निवडून “सर्च” बटणावर क्लिक करा. या यादीतून (Cotton soyabin subsidy) तुम्हाला तुमचे नाव, सर्वे नंबर, खाता नंबर, पिकाचे नाव आणि क्षेत्र या सर्व गोष्टी तपासता येतील.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो खुशखबर! १२ हजार रुपयांचा निधी आता १५ हजार होणार… या दिवशी लागू होणार निर्णय!

‘या’ महिलांना लागली लॉटरी; खात्यात 7500 रुपये जमा, पहा यादीत तुम्ही आहात का?

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी शासकीय निर्णय

शासनाने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी 5,000 रुपयांचे अनुदान देण्याची मान्यता दिली आहे. या निर्णयाचा फायदा घेत, शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न काही प्रमाणात स्थिर राखण्यासाठी मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे तातडीचा आर्थिक आधार मिळत आहे.

हे वाचलंत का? -  कर्टुला लागवडीतून शेतकरी झाला मालामाल, तीन महिन्यांत ९ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Nanded farmer earns lakhs from curtula cultivation

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

शासन निर्णयानुसार, 2024 मध्ये या योजनेअंतर्गत रु. 4194.68 कोटी निधी उपलब्ध झाला आहे, ज्यातील रु. 2516.80 कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपली यादी तपासताना, कधी कधी तांत्रिक अडचणींमुळे यादीत (Cotton soyabin subsidy) नाव दिसत नसेल तर, काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करावा.


Web Title – अरे व्वा! कापूस सोयाबीन अनुदान यादी जाहीर… असे तपासा यादीतील नाव!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj