मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी; शेतकरी झाला मालामाल, 1 एकरात उत्पन्न इतके लाख – Marathi News | Successful experiment of dragon fruit farming by Bajirao Datkhile farmer from Dharashiv Bhoom Pimpalgaon, income nearabout 12 lakh

धाराशीव जिल्ह्यातील भूम – पिंपळगाव येथील बाजीराव दातखिळे शेतकर्‍याचा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला. सध्या या फळाला बाजारात चांगली मागणी आहे. काही वर्षांपूर्वी केवळ मोठं-मोठ्या मॉलमध्ये मिळणारे हे फळ आता रस्त्यावरील फळ विक्रेत्याकडे मिळते. या फळाचा गोडवा आणि आरोग्यदायी फायद्यामुळे अनेकजण त्याची खरेदी करतात. आतापर्यंत परराज्यातून ही फळं विविध बाजारपेठेत येत होती. पण राज्यातही या फळाची शेती सुरू झाली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी भागासाठी, कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हे फळ वरदान ठरले आहे. अगदी कमी पाण्यात येणार्‍या ड्रॅगन फ्रूटने शेतकर्‍याला मालामाल केले आहे.

सी व्हेरायटी ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकऱ्यांचा सी व्हरायटी ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. बाजीराव पांडुरंग दातखिळे यांनी परराज्यात आणि इतर जिल्ह्यात जाऊन अगोदर या शेतीची सर्व माहिती घेतली आणि नंतर या फळाची लागवड केली. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता ड्रॅगनफ्रूट लावलं, एका एकरातून शेतकऱ्याला यंदा 10 ते 12 लाख उत्पन्न मिळणार आहे. सध्या ड्रॅगनफळाच्या शेतीला भरपूर फळी लागली आहेत. ड्रॅगन फ्रूटला बाजारभावही चांगला मिळत असल्याचे दातखिळे म्हणाले. अजून दोन वर्षात तर एकरी एक लाख रुपये खर्चात मोठे उत्पन्न मिळण्याचा दावा त्यांनी केला.

हे वाचलंत का? -  Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर... - Marathi News | Kharif season affected by changing climate

हे सुद्धा वाचा

10 ते 12 लाखांचे उत्पन्न

पारंपरिक पिकांच्या मागे न लागता एकरभरात शेतकऱ्याने ड्रॅगनफ्रूटची लागवड केली. या अनोख्या प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे. तालुक्यात असा प्रयोग करणारे ते पहिले शेतकरी ठरले आहे. दुष्काळाचा कायम मुक्काम असलेल्या शेतकऱ्यांना ड्रॅगन शेती वरदान ठरली आहे. बाजीराव दातखिळे यांना या ड्रॅगन शेतीतून 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. यंदाचा हंगाम ड्रॅगन फ्रूटमुळे चांगला जाणार असल्याचं त्यांचं म्हणणे आहे.

राज्यात ड्रॅगनफ्रुट शेतीला चांगले दिवस आले आहेत. चीनमधलं हे फळ आता मराठवाड्यासारख्या कमी पाणी असलेल्या जमिनीत मुळ धरू लागल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी या फळाला आता स्वीकारला असून जिल्ह्यातील अनेकांनी पारंपरिक पिकासोबत एकरात ड्रॅगनफ्रूट लागवड सुरू केली आहे. पिंपळगाव येथील शेतकरी बाजीराव दातखिळे यांनी 1 एकर 5 गुंठ्यात ही शेती केली आहे.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याने भंगारातून बनवला 55 फूटाचा बूम स्प्रे, 20 मिनिटात करतो दहा एकरात फवारणी - Marathi News | Nandurbar farmer builds 55 foot boom spray from scrap

या हंगामात मोठे उत्पादन

मार्केटमध्ये सरासरी 100 रुपयांचा भाव त्यांना मिळत आहे. या हंगामातून दहा ते बारा टन उत्पन्न मिळणार आहे. बाजार भाव प्रमाणे दहा ते लाख लाख उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. परिसरातील अनेक शेतकरी सध्या या ड्रॅगन शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. राबवलेल्या या प्रयोगामुळे ड्रॅगन शेती परिसरात करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या प्रयोगामुळे इतर युवा शेतकर्‍यांना देखील प्रेरणा मिळत आहे. यामुळे रोज अनेक शेतकरी त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.

हे वाचलंत का? -  Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार - Marathi News | 15 people were given employment by fish farming in the village


Web Title – Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी; शेतकरी झाला मालामाल, 1 एकरात उत्पन्न इतके लाख – Marathi News | Successful experiment of dragon fruit farming by Bajirao Datkhile farmer from Dharashiv Bhoom Pimpalgaon, income nearabout 12 lakh

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj