मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट – Marathi News | Cotton price in Maharashtra lower than guaranteed price

राज्यातील अनेक भागात कापसाचे मोठे उत्पादन आहे. कापूस पीक अनेक वेळा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेले आहे. यामुळेच कापसाला पांढरे सोने म्हटले जाते. दिवाळीच्या निमित्ताने कापसाची खासगी बाजारपेठेत आवक वाढली आहे. कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांची ग्रामीण भागात लगबग दिसून येत आहे. केंद्राचे हमीभाव ७ हजार रुपये आहे. मात्र, कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाचे दर उतरले आहे. खासगी व्यापारी कापसाला ६८०० ते ७ हजार भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले आहे. वायदे बाजारात मागील आठवड्यात ७२.३४ सेंट प्रति पौंडवर कापसाचे दर होते. ते आता ७२.६९ सेंट प्रति पौंडवर गेले आहे. त्यामुळे देशातील बाजारपेठेतही कापसाचे दर वाढणार आहे.

यंदा कापसाचे नुकसान, जास्त दराची अपेक्षा

नैसर्गिक आपत्तीनंतर उरलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. दसऱ्यापासूनच बाजारात बागायती कापूस दाखल झाला. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे कापसाचे आणखी नुकसान झाले. त्यामुळे शेतातून येईल तसा कापूस साठविण्याऐवजी थेट बाजारात विक्रीसाठी शेतकरी आणत आहे. त्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून दर कमी दिला जात आहे.

हे वाचलंत का? -  महिलांनो! मोफत गॅस सिलिंडर घ्यायचाय का? फक्त इथे करा एक अर्ज..!

हमीभाव पेक्षा कमी भाव

केंद्र सरकारने २०२४-२५ साठी कापसाच्या हमीभावात ५०१ रुपयांची वाढ केली आहे. चालू हंगामात मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार १२१ रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ५२१ रुपय हमीभाव जाहीर केला आहे. परंतु खासगी व्यापारी त्यापेक्षा कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात यंदा सरासरी कापसाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे. कापसाला मिळणारा दर अजूनही समाधानकारक नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली आहे. परंतु काही छोट्या शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे कापूस विकावा लागत आहे. खान्देश, विदर्भात कापसाचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्या भागात जिनिंग मील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.

हे वाचलंत का? -  सोशल मीडियातील मेसेजमुळे कांद्याच्या दरात घसरण, केंद्र सरकारच्या धोरणाचाही परिणाम - Marathi News | Onion prices fall due to messages on social media marathi news

हे वाचलंत का? -  Guava Rates | डाळिंबानंतर पेरुचे दिवस, सेंद्रीय पेरुला तब्बल एवढा भाव - Marathi News | Organic guava fruit good price at shrirampur agricultural market ahmednagar rs 60 per kg organic guava


Web Title – पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र…, शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट – Marathi News | Cotton price in Maharashtra lower than guaranteed price

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj