मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

डाळींच्या उत्पादनात ही पाच राज्ये आहेत सर्वात पुढे, महाराष्ट्राचा कितवा नंबर ?

भारतात भात आणि गहू, ज्वारी, नाचणी, बाजरीसह कडधान्य आणि डाळींचे देखील उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. डाळींचे उत्पादन देशातील पाच प्रमुख राज्यात होते. डाळींमधून चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळत असते. आज आपण पाहूयात भारतातील पाच टॉप डाळींचे उत्पन्न घेणारी राज्ये कोणती ? अशी कोणती राज्ये आहेत ज्यांचा वाटा एकूण डाळींच्या उत्पादनात 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कृषि मंत्रालयाने देशातील सर्वात जास्त डाळींचे उत्पादन घेणाऱ्या राज्यांची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये देशातील तीन राज्ये अशी आहेत. ज्यांचा डाळीच्या एकूण उत्पादनात 56.4 टक्के वाटा आहे.चला तर पाहूयात कोणती आहेत ही राज्ये ?

या राज्यात होते डाळीचं सर्वाधिक उत्पन्न

कृषी मंत्रालयाने आर्थिक वर्षे 2023-24 सर्वात जादा डाळीचं उत्पादन घेणाऱ्या राज्यांची यादी जाहीर केलेली आहे. यात मध्य प्रदेशाचा क्रमांक सर्वात वर आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक डाळींचे उत्पादन घेतले जाते. अहवालाच्या मते देशात उत्पादीत होणाऱ्या एकूण डाळीच्या उत्पादनाचा एक चतुर्थांश वाटा मध्य प्रदेशाचा आहे. देशात महाराष्ट्र डाळ उत्पन्न घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे साल 2023-24 मध्ये सुमारे 4000 किलोग्रॅम डाळीचे उत्पादन झाले होते. जे देशातील डाळीच्या एकूण उत्पादनाच्या सुमारे 16.3 टक्के आहे. दाळीच्या उत्पादन घेणाऱ्या राज्यात राजस्थानचे नाव देखील आहे. राजस्थानात गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये सुमारे 3660 किलोग्रॅम डाळीचे उत्पादन झाले होते. जे एकूण डाळ उत्पादनाच्या 14.8 टक्के आहे.

हे वाचलंत का? -  राज्यात उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा देखील अंदाज - Marathi News | Unseasonal rain in Maharashtra, temperature in the state will rise above 40 degrees marathi news

उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात देखील डाळ उत्पन जादा

डाळीचे उत्पन्न होणाऱ्या राज्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान शिवाय उत्तर प्रदेश आणि कर्नाटक राज्याचा देखील समावेश आहे. कृषी खात्याने दिलेल्या माहिती नुसार डाळ उत्पन्नात उत्तर प्रदेशाचा क्रमांक चौथा आहे. तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. कर्नाटकात सुमारे 9 टक्के डाळीचे उत्पन्न होते.


Web Title – डाळींच्या उत्पादनात ही पाच राज्ये आहेत सर्वात पुढे, महाराष्ट्राचा कितवा नंबर ? – Marathi News | These five states are leading in the production of pulses

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 18 वा हप्ता… इथे बघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या…

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj