मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

या प्राण्याचे दूध हजारो रुपये लिटर, त्या दूधाचे फायदे आहे तरी काय?

Camel Milk Benefits: दूध हे सकस आहार आहे. दूधात अनेक पोषक घटक असतात. गाई-म्हशीचे दूध 50 ते 100 रुपयांदरम्यान आहे. परंतु उंटाचे दूध खूप महाग आहे. उंटाचे दूध 3500 रुपये लिटर आहे. त्या दूधाचे अनेक फायदे आहेत. युवकांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. भारतात गुजरात आणि राजस्थानमध्ये उंट फार्म बनवून उंटाच्या दूधाची विक्री शक्य आहे.

भारतात उंटाचे दूध राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळते. आरोग्यासाठी हे चांगले असते. त्यामुळे आता त्याची मागणी वाढत आहे. देशातच नाही तर विदेशातही ते लोकप्रिय होत आहे. या दूधाची किंमत वेगवेगळ्या बाजारानुसार 3,500 रुपये प्रतिलिटर आहे.

आरोग्यासाठी फायदेशीर, हे आहेत घटक

उंटाचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि लोहासारखे पोषक घटक असतात. हे मानवी शरीराला शक्ती देते. त्यातील पोषक घटकांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या दुधाला मोठी मागणी आहे. हे दूध आपली रोगप्रतिकार क्षमता देखील वाढवते. ज्या लोकांना दूध प्यायल्यानंतर पोटाचा त्रास होतो. त्यांच्यासाठीही उंटाचे दूध चांगले आहे. कारण त्यात लॅक्टोजचे प्रमाण कमी असते. याशिवाय, काही संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उंटाचे दूध देखील फायदेशीर ठरू शकते.

हे वाचलंत का? -  पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र..., शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट - Marathi News | Cotton price in Maharashtra lower than guaranteed price

हे सुद्धा वाचा

विविध कंपन्यांकडून दुधाची खरेदी

राजस्थानसारख्या राज्यात उंटाच्या दुधाचा दर प्रतिलिटर 3,500 रुपयांपर्यंत जातो. अनेक औषध कंपन्या उंटाचे दूध खरेदी करतात. कारण त्याचे आरोग्यसाठी अनेक फायदे आहेत. हे दूध चॉकलेट, चीज, स्किन क्रीम आणि साबण यासारखी उत्पादनांमध्ये वापरले जाते.

बेरोजगार युवकांसाठी उंटाच्या दुधाची विक्री हा एक चांगला पर्यात आहे. काही लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरु होऊ शकतो. उंट डेअरी फार्मसाठी जास्त गुंतवणूक लागत नाही. तसेच यासाठी मुद्रा लोन सारख्या सरकारी योजनाही उपलब्ध आहेत. व्यवसाय सुरु करण्याआधी बिजनेस मॉडल, मार्केट एनालिसिस आणि त्याचे फायनेंशियल प्रोजेक्शन्स आणि रिस्क असेसमेंट समजून घेणे महत्वाचे आहे. या उद्योगासाठी काही इक्विपमेंट आणि प्रोसेसिंग कंटेनर तसेच मशीनही लागणार आहे.

हे वाचलंत का? -  मुंबईकरांनो! यादी आली; म्हाडा लॉटरीच्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध..!


Web Title – या प्राण्याचे दूध हजारो रुपये लिटर, त्या दूधाचे फायदे आहे तरी काय? – Marathi News | Sale of camel milk at Rs 3500 per litre, good business for youth

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj