मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

हे आहेत जगातील टॉप 10 तांदूळ उत्पादक देश; भारताचा नंबर कितवा? – Marathi News | World’s Largest Rice Exporters & Producers: 2023 24 Rice Production Report

भारत, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशसहीत जवळपास संपूर्ण जगात तांदूळ खाल्ले जातात. तांदळामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. तांदूळ तर अनेक देशांचा मुख्य आहारही आहे. पण असं असूनही सर्व देश मोठ्या प्रमाणावर भातशेती करत नाहीत. काही देश तर तांदळाच्या आयतीवर निर्भर आहेत. अशावेळी आम्ही तुम्हाला आज जगातील टॉप 10 तांदूळ उत्पादक देशांची माहिती देणार आहोत. तसेच 2023-24मध्ये जगात कोणत्या देशाने तांदळाचं सर्वाधिक उत्पादन केलं त्याची माहितीही देणार आहोत.

चीन

चीन हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. चीनची जागतिक तांदूळ उत्पादनात 28% भागिदारी आहे. 2023-2024 च्या पीक हंगामात चीनमध्ये सुमारे 144.62 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन झाले होते. तांदूळ चीनचा मुख्य आहार आहे आणि जियांग्सू, हुनान आणि ग्वांगडोंग या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ लागवड केली जाते. चिनी सरकार तांदूळ उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही देते. विशेष म्हणजे, चीन सर्वात मोठा तांदूळ उत्पादक असतानाही निर्यातीत तो मागे आहे.

भारत

चीननंतर तांदूळ उत्पादनात भारताचा दुसरा नंबर आहे. भारत हा तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश आहे. भारतातील सुगंधित बासमती तांदूळ यूएई, इराण, सौदी अरेबिया आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. मार्केटिंग वर्ष 2024-25 मध्ये भारताने सुमारे 18 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ निर्यात केला आहे. 2023-24 मध्ये भारताने 137.83 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केले होते.

हे वाचलंत का? -  स्ट्राबेरी शेतीतून दीड कोटी रुपये कमावले, असा होतो फायदा - Marathi News | A farmer became a millionaire from strawberry cultivation

बांगलादेश

भारताच्या नंतर बांगलादेश तांदूळ उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक तांदूळ उत्पादनात बांगलादेशचा वाटा 7% आहे. 2023-24 मध्ये बांगलादेशने 37 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केलं. परंतु, बांगलादेश त्याच्या गरजांसाठी भारतातून तांदूळ आयात करतो. कारण तांदूळ हे तेथील मुख्य अन्न आहे. बांगलादेश सरकार शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी अनुदान देखील देते.

इंडोनेशिया

इंडोनेशिया तांदूळ उत्पादनात चौथ्या स्थानावर आहे, परंतु बांगलादेशासारखा त्याला तांदूळ आयात करण्याची गरज पडत नाही. इंडोनेशिया तांदूळ उत्पादनात आत्मनिर्भर आहे. इंडोनेशिया दरवर्षी 33.02 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन करतो. इंडोनेशियाची जागतिक तांदूळ उत्पादनाचे 6% भागिदारी आहे.

व्हिएतनाम

व्हिएतनाम तांदूळ उत्पादन आणि निर्यात दोन्ही करत आहे. तो जगातील प्रमुख तांदूळ निर्यातक देशांमध्ये समाविष्ट आहे. 2023-24 मध्ये व्हिएतनामने 26.63 मिलियन मॅट्रिक टन तांदळाचे उत्पादन केले. जागतिक उत्पादनात त्याची हिस्सेदारी 5% आहे. मेकांग डेल्टा व्हिएतनामचा “तांदूळ कटोरा” म्हणून ओळखला जातो. व्हिएतनाम मुख्यतः चीन, फिलिपाईन्स आणि आफ्रिकन देशांना तांदूळ निर्यात करतो.

थायलंड

थायलंड हा प्रीमियम तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः चमेली तांदूळासाठी. 2023-24 मध्ये त्यांनी 20 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केलं, जो जागतिक तांदूळ उत्पादनाच्या 4% समजला जातो.

हे वाचलंत का? -  ही कोंबडी वर्षाला देते 200 अंड्यांची गॅरंटी, मांस देखील चविष्ठ, कुक्कुटपालनासाठी वरदान - Marathi News | Cari Nirbheek chickens guarantee 200 eggs per year, profitable for poultry farming

फिलीपाइन्स

फिलीपाइन्स तांदूळ उत्पादनात सातव्या क्रमांकावर आहे. फिलीपाइन्सने 12.33 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केलं, ज्याची जागतिक उत्पादनात 2% हिस्सेदारी आहे. तथापि, फिलीपाइन्स त्याच्या स्थानिक गरजांसाठी तांदूळ आयात करतो.

म्यानमार

म्यानमारमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात तांदूळ उत्पादन करतात. जागतिक तांदूळ उत्पादनात त्याची हिस्सेदारी 2% आहे. म्यानमारने 11.9 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केलं आहे. तांदूळ हे म्यानमारचं मुख्य पीक आहे आणि म्यानमार, चीन, बांगलादेश आणि काही आफ्रिकन देशांना तांदूळ निर्यात करतो.

हे वाचलंत का? -  लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून मोबाईल मिळणार का? जाणून घ्या सत्य परिस्थिती

पाकिस्तान

पाकिस्तानने 2023-24 मध्ये 9.87 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन केलं. जागतिक तांदूळ उत्पादनात त्याची हिस्सेदारी 2% आहे. पाकिस्तानचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे, विशेषतः युरोप आणि आफ्रिकेत बासमती निर्यात केला जातो.

जपान

जपान तांदूळ उत्पादनात दहाव्या स्थानावर आहे. जपानमध्ये 7.3 मिलियन मॅट्रिक टन तांदूळ उत्पादन होते, ज्याची जागतिक उत्पादनात 1% हिस्सेदारी आहे. जपानमध्ये तांदळाची मुख्यतः स्थानिक उपभोगासाठी लागवड केली जाते.


Web Title – हे आहेत जगातील टॉप 10 तांदूळ उत्पादक देश; भारताचा नंबर कितवा? – Marathi News | World’s Largest Rice Exporters & Producers: 2023 24 Rice Production Report

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj