पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 देण्यात आला आहे. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणविसाव्या हप्त्याची वाट बघत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात.
ह्या पद्धतीने शेतकरी तपासू शकतात त्यांच्या हप्त्याची स्थिती
1. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा – (https://pmkisan.gov.in).
2. ‘लाभार्थी स्थिती’ मुखपृष्ठावर जा: मुखपृष्ठावर लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा.
3. तुमचा तपशील प्रविष्ट करा: तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्या.
4. स्थिती तपासा: तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
1. पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर जा.
2. नवीन शेतकरी नोंदणी वर क्लिक करा.
3. आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरा.
4. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या.
पीएम किसान योजनेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?
1. जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट द्या किंवा https://pmkisan.gov.inवर लॉगिन करा.
2. ‘अपडेट मोबाईल नंबर’ पर्याय निवडा.
3. तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल क्रमांक द्या.
4. पडताळणीसाठी विनंती सबमिट करा.
Web Title – पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी होणार जमा? जाणून घ्या संपूर्ण माहिती… – Marathi News | When will the 19th installment of PM Kisan Yojana be deposited? Know complete information