मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी जमीन कसली, आता वक्फ बोर्डाचा जमिनीवर दावा, 103 शेतकऱ्यांना नोटिसा – Marathi News | Waqf board claims on 103 farmers land in latur

तळेगावच्या शेतकऱ्यांना नोटिसा

waqf board latur farmers: लातूर जिल्ह्यातील तळेगाव अचानक चर्चेत आले आहे. या गावातील 103 शेतकऱ्यांना वक्फ न्यायधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत. या शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर पटेल सय्यद इरफान यांनी दावा केला आहे. या प्रकरणात वक्फ बोर्डाकडे शेतकऱ्यांच्या तीन तारखाही झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी ही जमीन कसली. त्यानंतर आता तिच्यावर दावा केला जात आहे. या खटल्यात १०३ शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनालाही पार्टी करण्यात आले आहे.

१९५४, ५५ आणि ५६ च्या काळात तळेगावमधील शेतकऱ्यांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्या जमिनीवर वक्फ बोर्डाची आहे, असा दावा पटेल सय्यद इरफान नावाच्या व्यक्तीने केलेला आहे. त्यावरून शेतकऱ्यांना या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. १०३ शेतकऱ्यांना नोटीस मिळाल्याने तळेगावातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या शेतकऱ्यांनी या सर्व जमिनी विकत घेतल्या आहेत. या जमिनी विकत घेतल्याची सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांकडे आहे.

वक्फ बोर्डाकडून मिळालेल्या नोटीस दाखवताना शेतकरी

जमिनी खाली करा- वक्फ बोर्डाचा आदेश

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने नोटिसा बजावली. 300 एकर जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचा दावा केला आहे. तीन पिढ्यांनी जमीन कसून खाल्ल्या नंतर वक्फ बोर्डाने हा दावा केला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांकडे शेतीची मालकी, सातबारा अशी सर्व कागदपत्रे आहेत. वक्फ बोर्ड मात्र नोटीस पाठवत जमिनी खाली करा, असे सांगितले, असे शेतकरी तुकाराम काणवटे यांनी सांगितले.

हे वाचलंत का? -  टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्रज्ञान - Marathi News | Potatoes and tomato in one plant, tree grown in agricultural exhibition in Baramati marathi news

हे सुद्धा वाचा

हे वाचलंत का? -  Maharashtra Farmer News : शेतकरी दुहेरी संकटात, पिकांवरचं संकट कायम - Marathi News | Maharashtra rain update Farmer News agricultural cotton cultivation crop destroyed

जमीन आमचीच- शेतकऱ्यांचा दावा

शेतकऱ्यांना ही नोटीस जून महिन्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी पैसा जमा करुन वकील लावला. त्याच्या दोन, तीन तारखा झाल्या. आता यासंदर्भातील बातमी आल्यावर प्रशासन जागे झाले. त्यात २० हेक्टर जमीन दर्ग्याच्या नावाची निघाली. इतर सर्व जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची आहे. सर्व जमीन शेतकऱ्यांच्या नावावर असल्यामुळे दर्गा आणि वक्फ बोर्डाचा काहीच संबंध नाही, असा दावा शेतकऱ्यांनी प्रशासनाची कागदपत्रे पहिल्यानंतर केला.


Web Title – शेतकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी जमीन कसली, आता वक्फ बोर्डाचा जमिनीवर दावा, 103 शेतकऱ्यांना नोटिसा – Marathi News | Waqf board claims on 103 farmers land in latur

हे वाचलंत का? -  अरे व्वा! कापूस सोयाबीन अनुदान यादी जाहीर… असे तपासा यादीतील नाव!

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj