मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर – Marathi News | Mosambi Tur Produce Farmer are Worried in the state Two bloom, fruit drop crisis in Mosambi orchards; Tur producing farmers are worried

मोसंबी, तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर

सध्या मोसंबी उत्पादक शेतकरी, सोयबीन आणि तूर उत्पादकांवर जणू संकट कोसळले आहे. लहरी हवामान आणि सरकारी धोरणाच्या कात्रीत हा शेतकरी वर्ग सापडला आहे. एकीकडे कमी भाव तर दुसरीकडे रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. इंटरनेट, AI च्या या जमा‍न्यात या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी कृषी विभागकडे एकही सक्षम यंत्रणा नसल्याचे शल्य त्याहून अधिक आहे. तर दुसरीकडे नवीन तूर बाजारात येताच भाव कोसळला.  त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोसंबीला कवडीमोल भाव

मोसंबीच्या मृगबहाराच्या तोडणीला आलेल्या मोसंबीला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. बदलते वातावरण आणि उत्तर भारतात पसरलेल्या थंडीचा परिणाम दिसत आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मृग बहरातील मोसंबीची फळे परिपक्व होऊन तोडण्याच्या अवस्थेत आहे. मात्र बाजार भाव आणि मोसंबीची फळगळ होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एक महिन्यापूर्वी 35 ते 40 रुपये किलो दराने विकत असलेली मोसंबी थेट 8 ते 10 रूपयांवर आल्यामुळे मोसंबीवर केलेला खर्च ही निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

हे वाचलंत का? -  खुशखबर! शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात; पहा सोयाबीन कापूस अनुदान तुम्हाला आले का?

हे सुद्धा वाचा

मोसंबी परिपक्व होत असताना मंगू रोगाचं सावट पसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात जवळ पास 20 हजार हेक्टर क्षेत्र मोसंबीची लागवड झाली आहे. पण या रोगाच्या प्रादुर्भावाने फळगळती होत आहे. असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

तुरीचा भाव कोसळला, शेतकर्‍यांना मोठा फटका

हे वाचलंत का? -  Maharashtra Farmer News : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत, 10 दिवसात पाऊस नाही पडला तर... - Marathi News | Maharashtra latest Farmer News Kharip season crop destroyed Swabhimani Shetkari Saghtana

शेतकर्‍यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव प्रति क्विंटल 3 हजार रूपयांनी कोसळले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6 हजार ते 7 हजार पर्यंतच भाव मिळाला आहे. एक महिन्यापूर्वी तुरीचे भाव 10 हजारापर्यंत होते, पण आता नवीन पीक येताच, शेतकर्‍यांची तूर बाजारात येताच भाव कोसळले. व्यापार्‍यांनी तुरीचे भाव पाडल्याचा शेतकर्‍यांचा आरोप तर केंद्र सरकारने आयात केलेला तुरीमुळे ही भाव कोसळल्याचा आरोप होत आहे. दवाळ रोगाचे सावट असताना पण शेतकर्‍यांनी केलेल्या मेहनतीला चांगले फळ आले होते. पण आता भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज झाला आहे.

हे वाचलंत का? -  today forecast : कोकणात मुसळधार पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Maharashtra rain update today kokan declared yello alert


Web Title – दोन बहर, फळगळतीमुळे मोसंबी बागांवर संकट; तूर उत्पादक शेतकरी चिंतातूर – Marathi News | Mosambi Tur Produce Farmer are Worried in the state Two bloom, fruit drop crisis in Mosambi orchards; Tur producing farmers are worried

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj