मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Strawberry : भीमाकाठी फुलला ‘स्ट्रॉबेरीचा मळा; 10 गुंठ्यामध्ये 4 लाखांचे उत्पन्न, पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याचा आदर्श – Marathi News | Strawberry framing Pandharpur Farmer from Chale village took strawberry crop in his field, 4 lakhs income in 10 bunches, a farmer’s ideal breaking traditional agriculture

स्टोबेरीचे उत्पादन महाबळेश्वर पाचगणी व सातारा या ठिकाणी घेतले जाते. तिथे थंड वातावरण असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते. पण थंड हवेच्या ठिकाणी नाही तर चक्क गोदाकाठी एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. 10 गुंठे शेतात या तरूण शेतकऱ्यानं 4 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. त्याच्या या अभिनव प्रयोगाची तालुक्यातच नाही तर सोलापूरमध्ये चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात चांगली मागणी होत आहे. या विक्रीतून त्याला चांगला फायदा झाला आहे. तर अनेक शेतकरी त्याची ही शेती पाहण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येत आहेत.

शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

कृष्णा कोयनेच्या काठावरील फळपीक आता भीमेच्या तिरी फुलू लागली आहे. पंढरपूर तालुक्यातील चळे येथील तरुण शेतकरी सागर शिंदे याने 10 गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली यामधून त्याला 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. चळे येथील शेतकरी तरुण सागर शिंदे याने पारंपारिक शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला.

हे वाचलंत का? -  पांढरे सोने असलेल्या कापसाची मोठी आवक, दर मात्र..., शेतकऱ्यांसमोर पुन्हा नवीन संकट - Marathi News | Cotton price in Maharashtra lower than guaranteed price

हे सुद्धा वाचा

ऊस लागवडीला फाटा

सगर शिंदे याने अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने ऊस लागवडीकडे पाठ फिरवली. शेतात स्ट्रॉबेरीची 10 गुंठे जागेत लागवड केली. त्यासाठी त्याने मेहनत आणि कष्ट घेतले. त्याला या बागेतून उत्पादन सुरू झाले. त्याला 4 लाख रुपये उत्पन्न मिळाले. भीमेच्या तीरावर फुललेली ही स्ट्रॉबेरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक शेतकरी त्याची ही शेती पाहण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी येत आहेत.

स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात मागणी

हे वाचलंत का? -  खुशखबर! या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार पीक विमा; जाणून घ्या माहिती..!

सोलापूर जिल्ह्यातील विविध गावात तो स्ट्रॉबेरीची विक्री करत आहे. त्याच्या रसाळ आणि चवीला खास असलेल्या स्ट्रॉबेरीला ग्रामीण भागात चांगली मागणी आली आहे. शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत आहे. मात्र मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो शेतीकडे वळला. शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून वेगवेगळी पिके घेण्याकडे त्याचा कल वाढला. यामुळे शेतकर्‍याला चांगला फायदा झाल्याचे दिसत आहे. सागर शिंदे याचा कित्ता अजून काही तरुणांनी राबवला तर त्यांना तुटपुंज्या पगारावर  शहरात आयुष्य रखडावं लागणार नाही.


Web Title – Strawberry : भीमाकाठी फुलला ‘स्ट्रॉबेरीचा मळा; 10 गुंठ्यामध्ये 4 लाखांचे उत्पन्न, पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याचा आदर्श – Marathi News | Strawberry framing Pandharpur Farmer from Chale village took strawberry crop in his field, 4 lakhs income in 10 bunches, a farmer’s ideal breaking traditional agriculture

हे वाचलंत का? -  RBI चं शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट; विना तारण दोन लाखांचं कर्ज मिळणार - Marathi News | Guarantee Free Agri Loan Limit RBI's big gift to farmers; You will get a loan of two lakhs without collateral

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj