Ladki Bahin Yojana: जुलै 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठा निर्णय घेत लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले. परंतु काही महिलांनी नियमांना न जुमानता खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे. अशा महिलांवर आता सरकारने कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे की, अशा लाभार्थ्यांकडून पैसे परत वसूल केले जाणार आहेत.
खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर कारवाई?
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की, योजना गरजू महिलांसाठी आहे. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी जर खोटी माहिती भरली असेल, तर त्यांनी मिळवलेले पैसे परत केलेच पाहिजेत. योजनेचा खरा उद्देश साध्य व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा यावर मत मांडलं आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना आवाहन केलं की, ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्यांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावं.
आजच्या सोयाबीन दरात बदल, पहा आजचे सोयाबीन भाव..!
पैसे वसुली कशी होणार?
ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची अर्ज तपासणी सुरू आहे. या तपासणीनंतर:
पात्र नसलेल्या महिलांचे अर्ज रद्द केले जातील.
योजनेद्वारे मिळालेली रक्कम परत वसूल केली जाईल.
या वसूल रकमेचा उपयोग लोकोपयोगी कामांसाठी केला जाईल.
यासाठी अर्थ नियोजन विभागाशी समन्वय साधून एक रिफंड प्रणाली तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून पैसे परत मिळवून त्याचा उपयोग लोककल्याणकारी योजनांसाठी केला जाईल.
नाशिक जिल्ह्यातील या गावांमध्ये विहीर खोदण्यावर बंदी; चार लाखांचे अनुदानही थांबवले!
खोटी माहिती देणाऱ्या महिलांसाठी विशेष सूचना
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला आहे, त्यांनी त्वरित अर्ज मागे घ्यावा. यामुळे त्यांच्यावर भविष्यात कोणतीही कठोर कारवाई होणार नाही. परंतु जर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला नाही, तर त्यांच्यावर नियमांनुसार कठोर पावलं उचलली जातील.
राज्य सरकारचा उद्देश हा महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा आहे. त्यामुळे खोट्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांमुळे खऱ्या गरजू महिलांना हा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, सरकारने योग्य ती कारवाई करणे गरजेचं आहे.
सरकारने स्पष्ट केलं आहे की, वसूल केलेली रक्कम लोकोपयोगी कामांसाठी वापरण्यात येईल. या रकमेचा उपयोग महिलांसाठी इतर योजनांमध्ये केला जाईल. तसेच, रूटीन रिफंड सिस्टीमच्या माध्यमातून हा निधी व्यवस्थित राज्याच्या तिजोरीत जमा केला जाईल.
Web Title – लाडक्या बहिणींनो, आर्थिकरित्या सक्षम महिलांवर कारवाई सुरु… सगळे पैसे परत वसूल होणार!